-->
गांजा विक्रेत्या वर बारामती शहर पोलिसांचा छापा; 78 हजार रुपयांचा माल जप्त

गांजा विक्रेत्या वर बारामती शहर पोलिसांचा छापा; 78 हजार रुपयांचा माल जप्त

बारामती शहर पोलीस ठाण्याचे सपोनि कुलदीप संकपाळ यांना गोपनीय बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की 30 फाटा डोरलेवाडी या ठिकाणी गांजा विक्री सुरू आहे त्यावेळी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप अभिजीत कांबळे तुषार चव्हाण दशरथ इंगोले मनोज पवार बंडू कोठे यांनी त्या ठिकाणी दोन पंचा समोर छापा मारला असता त्याठिकाणी अमित कुमार अनिल धेंडे वय 40 वर्ष राहणार सिद्धार्थनगर तालुका बारामती हा त्या ठिकाणी चोरट्या पद्धतीने गांजा विक्री करत होता सदर इसमाच्या ताब्यातून तीन किलो व 840 ग्रॅम सुका तयार गांजा किंमत 78 हजार रुपये जागीच जप्त करण्यात आला हा इसम सिद्धार्थनगर भागातसुद्धा गांजा विक्री करत होता या इसमाला चार दिवस पोलीस कोठडी रिमांड माननीय पाटील मॅडम यांनी सुनावली आहे. सरकारी वकील राहुल सोनवणे यांनी पोलिसांची बाजू मांडली  ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख माननीय अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article