
काव्यतारा मंच आयोजित ऑनलाइन कविसंमेलनास उत्कृष्ट प्रतिसाद
Tuesday, June 14, 2022
Edit
इंदापूर प्रतिनिधी : लेकी माता रमाईच्या ग्रुप आणि काव्यतारा मराठी साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित प्रथम ऑनलाईन कविसंमेलनास उत्कृष्ट प्रतिसाद देत ऑनलाइन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कोरोनाचे सावट कमी होत असताना आजकाल ऑफलाईन कार्यक्रमास सुरूवात झालेली दिसून येत आहे परंतू रविवारी पार पडलेल्या या संमेलनात जवळपास ३५ ते ४० कवींनी सहभाग घेतला. प्रेम, पालक, गुरू शिष्य, आयुष्य जीवन, भावना, प्रेमभंग तसेच आयुष्याला वाट दाखवणार्या अनेक नव विषयांवर कविता या मंचावर सादर झाल्या. वय वर्षे १० ते वय वर्षे ७५ वर्षांच्या कवींनी या ऑनलाईन संमेलनास सामील होऊन आपली रचना सादर केली.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर स्थान कवी बापू भोंग, कवी औदुंबर भोसले, कवी विशाल पाटिल यांनी भूषविले.
लेकी माता रमाईच्या ग्रुपच्या संचालिका सौ.योजना वाघमारे व काव्यतारा मंच चे सदस्य सुमित वाघमारे यांनी या ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन केले होते. तथा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित वाघमारे यांनी केले. आणि सहभागी सर्व कवींना ऑनलाईन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर संमेलनात : लक्ष्मण शिंदे, मनिष आहिरे, समर्थ बंडगर, गणेश औरंगे, अश्विनी दिक्षित, निवृत्ती पाटिल, निरज आत्राम, लता चव्हाण, अनिसा शेख, सौरभ आहेर, पांडुरंग म्हस्के, सुमैया भिसे, कौस्तुभ गोसावी, विशाखा ढोपे, स्वाती राऊत, संजय सांगोलकर, योगेश कोंडके, प्रल्हाद घोरबांड, अविनाश खरे, महाविरा घोरबांड, अंकिता कोळेकर, पुष्पा दलाल, ज्योती उमरेडकर, शब्दाली मुळगावकर, विजयकुमार पांचाळ, विजया चांदगुडे, मीरा पाटिल व आदी मान्यवर, कवी आणि श्रोते उपस्थित होते.