-->
अश्लील फोटो व्हायरल केल्या प्रकरणी वाघळवाडी येथील एका तरुणावर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल

अश्लील फोटो व्हायरल केल्या प्रकरणी वाघळवाडी येथील एका तरुणावर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल

सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील आम्ही वाघळवाडीकर या व्हाट्स अप ग्रुपवर अश्लील फोटो व्हायरल केल्या प्रकरणी वाघळवाडी येथील एका तरुणावर  वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
           प्रदीप भगवान मांगडे रा. वाघळवाडी ता. बारामती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार राजकुमार सकुंडे रा. वाघळवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
             याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  यातील फिर्यादी हे घरी वाघळवाडी येथे असताना फिर्यादीचे मोबाईल वर व्हॉटसअप चालु केले असता त्यामध्ये आम्ही वाघळवाडी कर या ग्रुपवर आरोपी नामे तुषार राजकुमार सकुंडे रा वाघळवाडी ता बारामती जि पुणे याने फिर्यादीचा चेह-याचा फोटो महीलाच्या व इतर पुरूषांच्या शरीरावर जोडुन ते मॉर्फ करून फिर्यादीची बदनामी करण्याचे उददेशाने ते मॉर्फ केलेले अश्लील फोटो'आम्ही वाघळवाडी कर'या व्हॉटसअप ग्रुपवर टाकलेले आहेत.त्यानंतर फिर्यादी सदर इसमास जावुन तु माझे असले फोटो मोबाईलवर का टाकले असे विचारले असता त्यांने फिर्यादीला मी तुझे फोटो टाकले आहेत तुला काय करायचे आहे तु कर असे म्हणुन फिर्यादीला धमकी दिली म्हणुन वगैरे मजकूराचे तक्रारी वरून गुन्हा रजिस्टरी कतरण्यात आलेला आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article