
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना बारामती मद्ये गावोगावी पोचण्यासाठी प्रयत्न करणार: पृथ्वीराज नलवडे
Wednesday, June 29, 2022
Edit
प्रतिनिधी : दि: १३ जून
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना तळागाळात पोचण्यासाठी बारामती मधील पहिला मेळावा राष्ट्रवादी युवा नेते श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री ऋषिकेश (आबा) गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित दादा पवार यांच्या कल्पनेतून तालुक्यातील जास्तीत जास्त बांधवांना योजनेचा लाभ मिळावा तसेच अडीअडचणी व त्यावरील उपाय संदर्भात मार्गदर्शन मेळावा नुकताच पार पडला. या ऋषिकेश आबा गायकवाड यांच्या विनंतीवरून अनेक बँकांचे प्रतिनिधि तसेच परिसरातील युवकवर्ग ही उपस्थित होता.
या वेळी अण्णासाहेब पाटील योजनेमार्फत 400 हून अधिक लाभार्थ्यांना निर्माण केलेल्या पृथ्वीराज नलवडे यांनी मार्गदर्शन केले बारामती तालुक्यात पहिला आण्णासाहेब पाटील महामेळावा ऋषिकेश आबा गायकवाड यांच्या माध्यमातून, महामंडळाचे चे सर्वाधिक लाभार्थी निर्माण व्हावेत असेही नलवडे यांनी सांगितले वतसेच स्व.आमदार अण्णासाहेब पाटील त्यांच्या मौजे मंदुळ ता.पाटण जि सातारा ते मुंबई येथील माथाडी कामगार नेते ,आमदार , तसेच आखिल भारतीय मराठा महासंघ स्थापना या कार्याचा तसेच बलिदानाच्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच येत्या काळात गावा गावांमध्ये वाडी वस्तीवर अण्णासाहेब पाटील चे लाभार्थी निर्माण करण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी , सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री संभाजी नाना होळकर , पुणे जिल्हा बांधकाम सभापती श्री. प्रमोद काका काकडे देशमुख , सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. राजवर्धन दादा शिंदे, श्री.अभिजित भैय्या काकडे देशमुख , श्री. संग्राम काका सोरटे, श्री सुनील तात्या भगत , शैलेंद्र नाना रासकर , लक्ष्मण गोफणे , जितेंद्र निगडे हे उपस्थित होते