
अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा
Friday, July 1, 2022
Edit
बारामती - प्रतिनिधी
अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात महाराष्ट्र कृषी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा धारण केली होती.
यावेळी भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची वेशभूषा धारण करत गावात प्रभात फेरी काढली. गावकऱ्यांना शेतीचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली. त्यानंतर विद्यालयात कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्ह्यात फालीच्या अधिवेशनात सोमेश्वर विद्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक साळुंके ए एम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तर प्रकल्पात सहभागी साक्षी परकाळे, संपदा बनकर, सानिका बनकर यांनी प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी पायल मोरे, अजिंक्य मोरे, योगिता हडगळे, पुनम परकाळे, प्रांजळ ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक साळुंके ए एम, परकाळे डी एच, जगताप जी बी. कुतवळ एम एस उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात विद्यालयाच्या प्रांगणात फळझाडांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी परकाळे हिने केले तर आभार सानिका बनकर हिने मानले. कार्यक्रमाचे नियोजन फालीच्या प्रशिक्षण स्नेहा रासकर यांनी केले.
............
फोटो ओळ - कृषी दिनानिमित्त सोमेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.