
थोपटेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राणी पानसरे
Friday, July 1, 2022
Edit
ग्रामपंचायत थोपटेवाडीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ६ मतांनी सौ. राणी शशिकांत पानसरे यांची निवड झाली. त्यांचे विरोधातील उमेदवार श्री.पृथ्वीराज नलावडे यांना ३ मते मिळाली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी श्री. राजेंद्र शिंदे यांनी काम पाहिले. सरपंच सौ. रेखा बनकर, मावळते उपसरपंच श्री.कल्याण गावडे, सदस्य, श्री.संतोष खांडेकर, श्री.पृथ्वीराज नलावडे, श्री.लालासो कोरडे,सौ.सिमा थोपटे, सौ.कमल थोपटे, सौ.शुभांगी अडागळे, रिटायर्ड कॅप्टन श्री.जयवंतराव थोपटे, श्री.नानासो थोपटे, श्री.तुकाराम पानसरे, श्री.प्रमोद पानसरे ,श्री.सचिन वाघ, श्री.जितेंद्र थोपटे, श्री.वसंतराव जाधव, श्री.राजेंद्र हरिभाऊ थोपटे, श्री.अभिराज गवळी, श्री.अमोल थोपटे, श्री.अनिल पानसरे, यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाक्याची आतिशबाजी करत आनंद साजरा केला. उपसरपंच सौ.राणी पानसरे यांनी गावच्या विकासासाठी व महिला बचतगट सक्षमीकरण कटिबद्ध रहाणार आहे असे सांगितले.