
सुपिकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण करा
Tuesday, June 14, 2022
Edit
बारामती : महात्मा फुले कृषी विद्यपीठ राहुरी संलग्न,डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थी अतिश खरड, विश्वजित मदने, वैभव जाधव, ओंकार बांगर, प्रफुल्ल औटी, कुणाल कांबळे, अविनाश खाडे यांनी शिंपोरा(बाभूळगाव) येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमासाठी राहुल भोसले, अमोल चव्हाण, प्रशांत गायकवाड, दादा भोसले, अविनाश वाघ, अक्षय मुळे, प्रवीण भोसले, दशरथ माळवदकर, दिलीप माळवदकर व शेतकरी उपस्थित होते. जमिनीच्या सुपिकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी यावेळी केले.
पिकांच्या वाढीसाठी आवश्यक घटकांची पूर्तता जमिनीतून होत असते. त्यासाठी योग्य खत नियोजन करताना माती परीक्षण अहवालाचा लाभ होतो. माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, स्फुरद, सूक्ष्म अन्नद्रव्य सेंद्रिय कर्ब, जमिनीचा सामू विद्राव्य क्षारांचे प्रमाण आदींची माहिती मिळते. याबाबत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. पीक काढल्यानंतर किंवा पीक पेरणीपूर्वी तीन महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा. जमिनीची एकरूपता, रंग सुपीकता, खडकाळपणा, उंच सखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळ्या भाग पाडून ५ ते १८ नमुना गोळा करावे, २० सेंटिमीटर पर्यंत खड्डा करावा. माती बाहेर काढून खड्याच्या कडेची माती घमेल्यात घ्यावी. यातून जमा केलेल्या मातीतून खडे, पालापाचोळा, कचरा बाजूला काढावा. नमुना सावलीत वाळवून पिशवीत भरून माती परीक्षण प्रयोगशाळेत करून घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.प्रतिनिधी एस.पी.गायकवाड ,एस.वि.बुरुंगले व विषयतज्ज्ञ एस.सी.वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.