
शाळेचा पहिला दिवस...! चक्क बैलगाडी मधून आगमन.. दरेकर मळा जि. प. प्रा. शाळा दरेकरमळा यथे आनंदात विद्यार्थ्यांचे स्वागत....
Wednesday, June 15, 2022
Edit
वडगाव निंबाळकर :@प्रतिनिधी सुनील जाधव वडगाव निंबाळकर येथील जि. प. प्रा. शाळा येथे आज शाळेचा पहिला दिवस अगदी मोठ्या उत्साहाने व आनंदात शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे आगमन स्वागत करण्यात आले. यावेळी विशेष स्वागत चक्क बैलगाडीमध्ये बसून आगमन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना फेटे,फुल व खाऊ वाटप व वह्या पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या आशा नलवडे मॅडम यांनी मराठी शाळा चांगली या शाळेत मनासारखी शिक्षण,खेळ,आनंद व लहानपणातील आनंद घेता येतो, तसेच चांगल्या प्रकारे शिक्षण दिले जाते. मुलांचा लक्षपूर्वक अभ्यास करून घेतला जातो, असे आशा नलवडे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुलांचे पालक म्हणून विजय दरेकर, पिंटू पानसरे,बाळासाहेब पापळ, आकाश बालगुडे सिद्दिनाथ दरेकर,नाना पवार,किशोर दरेकर, संतोष दरेकर, सीमा राऊत,लता गायकवाड, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुभाष राऊत, पत्रकार सुनील जाधव उपस्थित होते.