-->
विषारी साप चावल्याने तरडोली येथील २० वर्षीय महिलेचा मृत्यू

विषारी साप चावल्याने तरडोली येथील २० वर्षीय महिलेचा मृत्यू

मोरगाव :  तरडोली नजीक तुकाईनगर ता. बारामती  येथील कोमल अजीत तांबे वय २० या  विवाहित महिलेचा विषारी साप चावून मृत्यू झाली असल्याची घटना काल दि. 3 रोजी घडली. अवघ्या दोन वर्षापूर्वी कोमल हिचा विवाह झाला होता. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
बारामती तालुक्यातील तरडोली नजीक तुकाईनगर  येथील कोमल अजित तांबे ही  विवाहित महिला  राहत्या घराच्या अंगणात कपडे वाळत  टाकत होती. यावेळी तिला विषारी साप चावला यानंतर मोरगाव येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून बारामती येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले होते . मात्र उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला.

कोमलच्या  मृत्यू पक्षात पती, सासू-सासरे,  आई वडील असा परिवार आहे.  कोमल यांचे वय यांचे लग्न अवघ्या दिड वर्षांपूर्वी झाले होते. कोमल यांचे माहेर तरडोली नजीक मासाळवाडी हे असून तिच्या अचानक झालेला मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article