
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ च्या अध्यक्षपदी श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करा : - पृथ्वीराज नलवडे
Monday, July 4, 2022
Edit
बारामती- युती सरकारच्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर हजारो मराठा बांधवांना नवउद्योजक बनविण्याचे काम तत्कालीन अध्यक्ष, माथाडी कामगार व मराठा समाजाचे नेते मा नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब यांनी केले होते. त्यांनी एक मराठा , एक लाख उद्योजक अशी संकल्पना करून त्यांच्या अध्यक्ष काळामध्ये प्रत्येक जिल्हा , तालुका या शिवाय गावोगावी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडचणीत आलेल्या महामंडळाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी लाखो मराठा युवकांना नवउद्योजक घडविण्यासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदी मराठा नेते मा नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करून मराठा समाजाला न्याय द्यावा ह्या साठी , मराठा संघटना , मराठा क्रांती मोर्चा , महामंडळ लाभार्थी यांच्या कडून जोरदार मागणी होत आहे.
आपल्या वडिलांच्या नावाने असलेल्या महामंडळाला त्याच्या मुलानेच खरा अर्थाने न्याय देण्याचा प्रमाणिक प्रयत्न केले. यापुढे ही महामंडळामार्फत विविध नवनवीन योजना राबवण्यासाठी श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब यांनाच संधी दिली गेली पाहिजे.. असे मत पृथ्वीराज नलवडे यांनी व्यक्त केले.