-->
बारामती: करंजेपुल-वाणेवाडी रस्त्यावर अवैद्यरित्या सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री धंद्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई; चौघांना अटक

बारामती: करंजेपुल-वाणेवाडी रस्त्यावर अवैद्यरित्या सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री धंद्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई; चौघांना अटक

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे करंजेपुल वाणेवाडी रस्त्यावर अवैद्यरित्या सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री धंद्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई करत
चौघांना ताब्यात घेतले आहे. 
        याबाबत सविस्तर माहिती अशी,  सोमेश्वरनगर येथील कारखाना रस्त्यावर एका ठिकाणी अवैद्यरित्या ऑनलाइन चक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांना समजल्यावर सपोनी सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी
आण्णा शरद कारंडे वय 31 वर्षे रा मोराऴवाडी ता बारामती,  गणेश रमाकांत पवार वय 22 वर्षे रा निरा ता पुरंदर जि पुणे, गणेश शामराव निगडे वय 40 वर्षे रा निरा ता पुरंदर जि पुणे, अनिकेत बाबुराव कचरे रा रावडी ता फलटन जि सातारा या चौघांना ताब्यात घेत एक कॉम्प्युटर, खेळण्याचे साहित्य, वही पेन व रोख रक्कम जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकुन 16870/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.
       याबाबत पो.कॉ. अमोल भुजबळ यांनी फिर्याद दिली असून  गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथमवर्ग न्यायालय बारामती यांचे कोर्टात रवाना केला असुन गुन्हाचा पुढील तपास पो. हवा. नागटिळक हे करित आहेत. 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article