
तरडोली प्राथमिक शाळेत आषाढी वारी निमित्ताने दिंडी; टाळ व मृदंगाच्या गजरात दिंडी उत्साहात संपन्न
Saturday, July 2, 2022
Edit
मोरगाव : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात प्राथमिक शाळांमधून आज आषाढी वारी निमित्ताने दिंडी काढण्यात आली होती. तरडोली ता. बारामती येथे प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका प्रतिभा कुतवळ व सहशिक्षिका कविता लवांडे यांनी या दिंडीचे नियोजन केले होते.
आज शनिवार दिनांक २ रोजी तरडोली ता. बारामती येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींची आषाढी वारी निमित्ताने पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. या दिंडी सोहळ्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत चे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच अंगणवाडीच्या चिमुकल्या मुलांनी सहभाग घेतला होता. तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक प्राथमिक शाळांमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आज झालेल्या सोहळ्यामध्ये यामध्ये विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला. हरिनामाचा जयघोष करत गावातून प्रदक्षिणा मारली. या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्याची विठ्ठल, रुक्मिणी, मुक्ताई विविध वेशभूषा करण्यात आली होती. तर उर्वरीत छोट्या मुलींनी साड्या व विद्यार्थ्यांनी धोतर, कुर्ता, टोपी वारकऱ्यांचा असा पारंपारिक पोषक चढवला होता. चिमुकल्यांचा हा वारीतील पोषक पाहण्यासाठी तरडोलीतील युवक व ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. मुख्य शाळेतून सुरू झालेले हा दिंडी सोहळा मार्गक्रमण करत मारुती मंदिर बस स्थानक व पुन्हा शाळेमध्ये गेल्या या दिंडी सोहळ्या दरम्यान विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.तर मारुती मंदिराच्या समोर फुगडी तर टाळ व मृदंगाच्या गजरात अभंग गायले. हे पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती