
अमृत महोत्सवानिमित्त पणदरे येथील सावित्री बनात आजी-माजी सैनिकांच्या हस्ते ७५ वृक्षांची लागवड
Monday, August 15, 2022
Edit
पणदरे- बारामती तालुक्यातील पणदरे येथील सावित्री बन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वृक्षांची लागवड करण्यात आली.
संपूर्ण भारतात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विविध कार्यक्रमही मोठ्या उत्साहात सर्वांनी सादर केले पण पणदरे येथील सावित्री बनात आजचा स्वातंत्र्य दिन आजी-माजी सैनिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व आजी-माजी जवान सैनिक यांना औक्षण करण्यात आले. तसेच पणदरे पंचक्रोशीतील शहीद जवान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या वीरपती व कुटुंबीयांच्या वतीने वृक्ष मातीशी एकरूप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व आजी-माजी सैनिक उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते 75 वृक्ष मातीशी एकरूप करण्यात आली. खऱ्या अर्थाने आजचा स्वातंत्र्य दिन जवानांच्या समवेत साजरा करण्यात आला. सर्व सैनिक व जवान यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा गुणगौरव करून देशभक्ती वृक्षारोपणाने वृक्षसंवर्धनाने जतन करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जयहिंद फाउंडेशन चे सर्व सदस्य, महिला, मुले मुली, पणदरे ग्रामविकास मंचाचे सर्व सदस्य उपस्थित होते.