
बारामती: शाळेत मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलांवर तरुणांचा कोयत्याने हल्ला
Thursday, August 18, 2022
Edit
बारामती : शाळेत आपल्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या वडिलावर काही अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या अल्पवयीन मुलांनी अतिशय निर्घृणपणे संबंधित व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खरंतर संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली नाही.
या सीसीटीव्हीत हल्लेखोर मुलांच्या हातात धारदार शस्त्र दिसत आहेत. तसेच ते अतिशय निर्घृणपणे हल्ला करत असल्याचं देखील स्पष्टपणे दिसत आहे. बारामती शहरातील कविवर्य मोरोपंत हायस्कूलमध्ये मुलीला न्यायला आलेल्या वडिलांवर खुनी हल्ला झाला. आरोपींनी मुलीच्या वडिलांवर धारदार शस्त्रांनी केले वार.
हल्ला करणारे मुले हे अल्पवयीन आहेत. या हल्ल्यामध्ये वडील शशिकांत कारंडे यांचा जागीच मृत्यू. श्रीराम नगर कवी मोरोपंत हायस्कूल समोर संबंधित घटना घडली. बारामती शहरातील त्रिमूर्ती नगर येथे राहणारे 54 वर्षीय शशिकांत कारंडे हे आज सायंकाळी सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान शहरातील कविवर्य मोरोपंत हायस्कूल येथे मुलीला आणावयास गेले असताना बाहेर थांबलेल्या तीन युवकांनी धारदार शस्त्रांनी डोक्यात, मानेवर वार केल्याने ते जागेवरच कोसळले.
शशिकांत कारंडे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. यापूर्वी देखील याच मुलांनी शशिकांत कारंडे यांच्या मुलावर वार केले होते. त्यानंतर आज शाळेसमोरच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलं हल्ला करुन फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.