
मयुरेश्वर विद्यालयातील २००१ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा घेत शाळेसाठी इन्व्हर्टर संच दिला भेट
Tuesday, August 9, 2022
Edit
मोरगाव : मोरगाव ता. बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला. सण २००१ च्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन शिक्षकांना फेटे बांधून, सन्मानचिन्ह व वृक्ष भेट देऊन गौरव केला. विचारांची देवाण घेवाण करून विद्यालयाला आवश्यक असणारा इन्हर्टर भेट म्हणून दिला.
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील मयुरेश्वर विद्यालयात तब्बल एकवीस वर्षानंतर सण २००१ - २००२ मधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थी स्नेह मेळाव्या निमित्ताने एकत्र आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य गिरीमकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच निलेश केदारी होते. या बॅचचे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले असून बरेचसे विद्यार्थी उद्योजक, सरकारी नोकरी, व्यवसाय, उद्योग धंद्यामध्ये स्थिरस्थावर झाल्याचे समाधान शिक्षकांनी व्यक्त केले. यावेळी शाळेविषयी कृतज्ञता म्हणुन विद्यार्थ्यांनी मिळून शाळेसाठी इन्व्हर्टर संच भेट म्हणून दिला . सामाजिक जाणिवेचे भान ठेवून अकाली निधन पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करण्याचे कबूल केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य गिरिमकर सर यांनी मनोगतामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा असा स्नेहमिळावा हा शाळेच्या उन्नतीसाठी, भौतिक विकासासाठी प्रमुख स्रोत असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी मनोज गायकवाड, नितीन बांदल, सचिन तावरे,विश्वास पवार यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्याची आठवण व पर्यावरणाची जाणीव म्हणून प्रत्येकाला एक -एक रोप भेट म्हणून दिले.