
कोऱ्हाळे बुद्रुक येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध
Saturday, December 10, 2022
Edit
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बहुजन महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणारे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोऱ्हाळे बुद्रुक येथे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटलांच्या निषेच्या घोषणा देऊन त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून संस्था उभ्या असे विधान केले होते. त्यांच्या वक्तव्याचा कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप धापटे, माजी उपसरपंच दत्तात्रय माळशिकारे, हेमंत गडकरी, लखन कडाळे, जितेंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी सरपंच रवींद्र खोमणे, माजी उपसरपंच अंकुश चव्हाण, बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष महेश चव्हाण, नंदकुमार कोंढाळकर, अनिल चव्हाण, म्हस्कु चव्हाण,प्रतीक चव्हाण आणि कोऱ्हाळे बुद्रुक येथील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.