-->
बाल निरीक्षक गृहात राहणारा अनाथ बनला शासनाचा अधिकारी

बाल निरीक्षक गृहात राहणारा अनाथ बनला शासनाचा अधिकारी

काही वर्षांपूर्वी अक्षर ओळख होण्यापूर्वीच अगदी लहान वयात बारामती येथील बाल सुधाग्रहात दाखल झालेला अनिल माणिक जाधव. याने अनाथ म्हणून बाल निरीक्षण गृह बारामती या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. कुणीही जवळचे नातेवाईक नाहीत बाल निरीक्षण गृहातील इतर साथीदार हेच त्याची भावंड व बाल निरीक्षण गृहातील सर्व अधिकारी वर्ग हेच त्याचे पालक. ज्या काही सुविधा सुधारा ग्राहक आहेत त्याचा लाभ उठवत त्याने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे आयटीआय पर्यंत शिक्षण घेतले बारावी पूर्ण करून नंतर तो खाजगी कंपनीत नोकरीला लागला त्या ठिकाणी एमएपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. केवळ उच्च शिक्षण घेऊनच तो थांबला नाही तर कष्ट करत करत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणं सुरू ठेवलं आणि आज महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी(A.S.O.) मंत्रालय या ठिकाणी त्याची लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेली आहे. आज सुशिक्षित पालक असणाऱ्यांची मुलं या इंटरनेटच्या जाळ्यात अडकून सोशल मीडिया ॲप मध्ये रात्रंदिवस डोके घालून खऱ्या शिक्षणापासून भरकटत आहेत आणि अनाथ अनिल जाधव यांनी कुणाचाही डोक्यावर हात नसताना आपुलकीची माया लावणारा कोणी नसताना आज शासनामध्ये एक उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केलेला आहे खरोखर ही गोष्ट समाजातील सर्व मुलांना आदर्शवत अशीच आहे. आज विधी संघर्ष ग्रस्त बालकांची व ज्या बालकांना काळजीची गरज आहे अशा दोन्ही प्रकारची बालकांची समस्या  सतावत असताना. अनिल जाधव याची यश हे निश्चितपणे आशेचा  किरण आहे ही माहिती जेव्हा पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना समजली तेव्हा त्यांनी अनिल जाधव यांचे आभार मानले आणि अशा मुलांची उदाहरणं जगासमोर इतर मुलांसमोर येणे अत्यंत गरजेचं असल्याचं प्रभारी अधीक्षकांना सांगितलं
अनिल माणिक जाधव याचं बारामती शहर पोलिसांतर्फे अभिनंदन कारण या निरीक्षण गृहाची पोलिसांचा नेहमीच संबंध येत असतो अनिल जाधव याचं या संस्थेचे चेअरमन सदाशिवराव (बापूजी) सातव तसेच सचिव  डॉक्टर अशोक तांबे व संपूर्ण कार्यकारी मंडळ यांनी अभिनंदन केलेले आहे तसेच या संस्थेच्या अधीक्षिका श्रीमती सुगंधा जगताप यांना जेव्हा ही बातमी समजली त्यावेळेस त्या आनंदाने थोड्याशा भावनिक झालेल्या होत्या. खरोखर अनिल माणिक जाधव यांचे यश हे अनमोल आहे. अनिल माणिक जाधव याला महाराष्ट्र शासनाने अनाथ प्रमाणपत्र महिला बालविकास खात्यामार्फत दिलेले आहे यावर्षीपासून अनाथांना सुद्धा शासनाच्या नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन देण्यात आलेले आहे. त्याचा लाभ अनिल माणिक जाधव याला झालेला आहे. आणि आज पासून अनाथ अनिल हा बनला सर्वसामान्यांचा नाथ. खरंच अनाथ ते नाथ हा प्रवास अनिल चा थक्क करणारा आहे त्याचा हार्दिक अभिनंदन.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article