-->
बारामती: सायंबाचवाडी येथे श्रमदानातून बांधला वनराई बंधारा; महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

बारामती: सायंबाचवाडी येथे श्रमदानातून बांधला वनराई बंधारा; महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

मोरगाव : बारामती तालुक्यातील सायंबाचवाडी  येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे .तालुका कृषी अधीकारी सुप्रिया बांदल यांसह अस्मिता ग्राम संघाच्या महीला व तालुक्यातील महीला कृषी सहाय्यकांनी   या श्रमदानामध्ये उत्फुर्तपणे सहभाग घेतला होता.

 सायंबाचीवाडी येथे श्रमदानातुन वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी श्रमदान करण्यासाठी अस्मिता ग्राम संघाच्या महिला सर्व सदस्य , अध्यक्ष तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल व तालुक्यातील सर्व महिला कृषी सहाय्यक प्रोत्साहनपर श्रमदानासाठी उपस्थित होत्या .
तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात  व सर्व महीला कृषी सहाय्यक यांच्या मदतीने  तृप्ती गुंड  यांनी सर्व महिला व शेतकऱ्यांना एकत्र आणून श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.
 या श्रमदानासाठी  कृषीमैत्रीण रोहिणी इंगळे , मनोहर भापकर, बाळासाहेब झणझने , महिला वर्ग तसेच इतर ग्रामस्थ सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील वनराई बंधाऱ्यामुळे परीसरातील शेती व विहरींना फायदा होणार असल्याने येथील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे .

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article