
मराठा समाजाच्या आरक्षणास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
Wednesday, February 5, 2020
Edit
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आरक्षणास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आरक्षणाला अंतरिम स्थगिती देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणावर पुढील सुनावणी आता १७ मार्चला होईल. राज्य सरकारने शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. प्रथम या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयाने स्थगिती देण्याची याचिका फेटाळून लावली होती.