कोऱ्हाळे बु, किसन चव्हाण यांचे निधन
Friday, October 16, 2020
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
समता नगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसन श्रीरंग चव्हाण ( वय. ६५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
समतानगर येथील प्रभाग क्रमांक ४ चे ग्रामपंचायत सदस्य भाग्यवान चव्हाण यांचे ते वडील तर माजी सदस्या जनाबाई चव्हाण यांचे ते पती होते. समता नगर येथील बौद्ध युवक संघटनेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. गावात ते किसन अध्यक्ष नावाने प्रसिध्द होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.