बारामती तालुका मराठी पत्रकार संघाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन
बारामती - प्रतिनिधी
बारामती तालुका मराठी पत्रकार संघाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन बारामती लोकसभा मतदार संघाच्या कार्यक्षम खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिले.
बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी खासदार सुप्रिया सुळे बारामती तील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी सुर्वे यांनी सर्वच नवनिर्वाचित कार्यकारिणीचे कौतुक केले. व येणाऱ्या काळात मराठी पत्रकार संघाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी ज्येष्ठांच्या अनुमतीने बारामतीमध्ये पत्रकार संघाचे अधिवेशन घेण्याचा मानस खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे बोलून दाखवला. यावर सुप्रिया सुळे यांनी तुम्ही कधीही अधिवेशन घ्या तुम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल व तुमच्या अधिवेशनाला माझी उपस्थिती हमखास असेल असेही त्यांनी सांगितले.