
श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालयात कै.व्ही.डी.आण्णा जगताप यांचा पुण्यस्मरण दिन कृतज्ञता दिन म्हणून साजरा
Sunday, February 6, 2022
Edit
भिकोबा नगर : पणदरे परिसरात शिक्षणाची व सहकाराची गंगा घराघरापर्यंत पोचवणारे व या परिसराचा आर्थिक व सामाजिक विकास साधणारे कै.व्ही.डीआण्णा जगताप यांचा तृतीय पुण्यस्मरण दिन श्री विठ्ठल शैक्षणिक व सहकार संकुलात कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला.श्री विठ्ठल विद्या प्रसारक मंडळ भिकोबा नगर संस्थेचे अध्यक्ष श्री.अरविंददादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास संस्था सदस्य श्री नानासाहेब बापू जगताप ,संस्था सचिव श्री शिवाजीकाका जगताप, संस्था सदस्य श्री अजिंक्य भैय्या जगताप उपस्थित होते.श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालयात अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री विठ्ठल व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली.व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना प्राचार्य श्री पवार सर यांनी अण्णांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प ग्रामीण कथाकथनकार प्रा. रविंद्रजी कोकरे सर यांनी विद्यार्थ्यांना करोना काळातील शैक्षणिक जडणघडण* या विषयावर व्याख्यान दिले.कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे तरी विद्यार्थ्यांनी खचून न जाता शिक्षकांच्या व पालकांच्या मार्गदर्शनातून उज्वल यश संपादन करावे हीच अण्णांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.या प्रसंगी इ5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेली प्रगती राहुल चव्हाण, इ.8वी NNMS परीक्षेतील अनुष्का राजेंद्र मदने हिचा तर सारथी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आलेल्या सानिका राजेंद्र भापकर,साक्षी सचिन पवार व ओम अनिल धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला.विद्यालयात निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा घेतल्या. अण्णांच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डांगे सर इंग्लिश मीडियम विद्यालयाचे मुख्याध्यापक कुंभार सर व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे एस.एम व श्री बंडगर एम.एस यांनी केले तर आभार श्री खलाटे सर यांनी मानले.