-->
बारामती लीनेस क्लब तर्फे एमआयडीसी अग्निशमन केंद्रात रक्षाबंधन कार्यक्रम

बारामती लीनेस क्लब तर्फे एमआयडीसी अग्निशमन केंद्रात रक्षाबंधन कार्यक्रम

बारामती येथील लीनेस क्लबच्या वतीने एमआयडीसीतील अग्निशमन केंद्रामध्ये जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. 
        याप्रसंगी बारामती लीनेस क्लबच्या अध्यक्षा उज्वला शिंदे, खजिनदार मनीषा खेडेकर, कॅबिनेट ऑफिसर सुवर्णा मोरे, विजया कदम व सुनिता तावरे आदींनी जवानांचे औक्षण करून राख्या बांधल्या.
        बारामती एमआयडीसी अग्निशमन केंद्रप्रमुख सुनील इंगवले यांनी लीनेस क्लब सदस्यांचे स्वागत करून घरगुती सोसायटी, सार्वजनिक ठिकाणे, औद्योगिक कंपन्या आदी ठिकाणी आग लागल्यानंतर व अपघात प्रसंगी अग्निशमन दलाच्या कार्यपद्धती बाबत मार्गदर्शन केले.

        लीनेस क्लबच्या अध्यक्षा उज्वला शिंदे यांनी अग्निशमन दलाचे जवान संकट काळी जीवित हानी व वित्त हानी थांबवण्यासाठी, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून करत असलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

        बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी गृहिणी व विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन उपकरणे वापरण्याचे प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम आयोजित करावेत त्यासाठी बारामती एमआयडीसी अग्निशमन केंद्र व बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

       या रक्षाबंधन कार्यक्रमादरम्यान उपस्थित लीनेस क्लबच्या सदस्यांना अग्निशमन केंद्रातील उपकरणे, फायर ब्रिगेड वाहन, आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाणारी अत्याधुनिक यंत्रसामग्रीची माहिती केंद्रप्रमुख सुनील इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

लीनेस विजया कदम यांनी प्रास्ताविक केले. सुनिता तावरे यांनी मनोगत व्यक्त केले व मनीषा खेडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article