जीवावर बेतलेल्या आजारावर मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यशस्वी मात
Saturday, September 6, 2025
Edit
बारामती : योग्य वेळी योग्य उपचार मिळाले, तर जीवावर बेतणाऱ्या आजारावरही मात करता येते हे बारामतीतील मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने सिद्ध करून दाखवले आहे.
करण हा केवळ 25 वर्षांचा तरुण. लहानपणापासूनच त्याच्या विविध शारीरिक तक्रारी सुरु होत्या. वडिलांचे निधन झाल्यामुळे आईवरच घराचा भार होता. काही दिवसांपूर्वी त्याला *अर्धांगवायू (पॅरालिसिस)*चा झटका आला. अचानक आलेल्या या संकटामुळे करण व त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरात ना नातेवाईकांची मदत, ना आर्थिक आधार.
मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने परिस्थितीची गंभीरता ओळखून त्याला तातडीने दाखल करून घेतले. तपासणीत मेंदूच्या पुढच्या भागात रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले. ही अवस्था अत्यंत धोकादायक असते. त्याचबरोबर करणला फिट्सचे झटकेही येत होते. अशा वेळी उपचार करणे धोकादायक ठरू शकते, तरीही डॉक्टरांनी धाडस दाखवत तीन दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरु केले.
सोबतच हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी टीमने सतत थेरपी देत रुग्णाच्या हातपायांची ताकद परत मिळवून देण्यास मदत केली. सर्वसाधारणपणे पॅरालिसिसमधून पूर्ण बरे होणे कठीण असते, मात्र सात दिवसांच्या सातत्यपूर्ण उपचारांनंतर करण पूर्णपणे ठणठणीत बरा झाला आणि डिस्चार्ज घेऊन घरी परतला.
या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. विशाल मेहता म्हणाले,
"मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त असून, एक्सपर्ट डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांच्या समर्पित सेवेमुळेच अशक्य वाटणारे उपचार शक्य झाले. आमचे हॉस्पिटल पंचक्रोशीतील रुग्णांसाठी विविध योजना राबवत असून रुग्णसेवेत सदैव तत्पर राहील."