-->
कै नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार

कै नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार

प्रतिनिधी - बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथे दिनांक 5 ऑक्टोबर रोजी कै नामदेवराव नालंदे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिष्ठान तर्फे बारामती व पंचक्रोशीतील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री गणेश इंगळे पोलीस उपयुक्त पुणे, श्री गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच दीपक वाबळे, माधव जोशी व सर्व पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
   यावेळी बोलताना योगेश नालंदे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती पत्रकार बांधवांना दिली, यानंतर बारामती मधील पत्रकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जाणारा "कै नामदेवराव नालंदे जीवनगौरव पुरस्कार", मरणोत्तर कै द.रा. पवार यांना तसेच पळशी येथील पत्रकार श्री काशिनाथ पिंगळे यांना देण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गणेश इंगळे सर व गणेश बिरादार सर यांनी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
श्री बिरादार म्हणाले की, डिजिटल काळातील पत्रकारितेमधील बदल स्वीकारून पत्रकारांनी अपडेट राहिले पाहिजे. बऱ्याच घटना या पत्रकारांच्या सतर्कतेमुळे उघड होतात. खरी पत्रकारिता करून हा लोकशाहीचा स्तंभ मजबूत करण्याचे काम पत्रकार बांधव करत आहेत.
या कार्यक्रमासाठी नानासाहेब साळवे, प्रशांत नालंदे, मेघराज नालंदे, किरण हिवरे, प्रदीप ढुके व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. चंदूकाका सराफ यांच्या वतीने कार्यक्रमासाठी ट्रॉफी सौजन्य दिले होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article