-->
राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर शिवजयंतीच्या तारखेबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर शिवजयंतीच्या तारखेबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमचं आवाहन आहे त्यांनी तिथीचा हट्ट सोडावा आणि 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर करावी, असं ट्वीट राष्ट्रवादीच्या वतीने अमोल मिटकरी यांनी केलं होतं. राष्ट्रवादीच्या या मागणीला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे तारखेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करणार आहेत. तर शिवसेना मात्र तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकिय शिवजयंतीच साजरी करतील आणि शिवसेना पूर्वीपासून जशी तिथीनुसार शिवजयंती साजरी करते, त्याच पद्धतीने यंदाही करेल, असं परब म्हणाले आहेत.


दरम्यान, शिवजयंतीबाबतच्या तिथी आणि तारखेबाबतचा निर्णय घ्यायला शासनाकडे वेळ कमी आहे. सरकार स्थापन झाल्यानंतरची पहिली शिवजयंती ही तारखेप्रमाणेच होईल. यानंतर सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परब यांनी दिली आहे.


Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article