-->
बारामती, आज आणखी एका कोरोनबाधिताचा मृत्यू तर आज नवीन 15 रुग्ण सापडले

बारामती, आज आणखी एका कोरोनबाधिताचा मृत्यू तर आज नवीन 15 रुग्ण सापडले

काल बारामती मध्ये एकूण एकशे दोन नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 97 नमुन्यांचा अहवाल निगेटिव आला असून बारामती शहरातील 2 व ग्रामीण भागातील मूर्टी येथील एक असे तीन रुग्णांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेला आहे व इतर तालुक्यातील दोन  रुग्णांचे अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेले आहेत तसेच आज ग्रामीण रुग्णालय रुई येथे शासकीय एंटीजेन टेस्ट सुरू केली असून आज संध्याकाळपर्यंत 38 जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी  बारामती शहरातील तीन व ग्रामीण भागातील माळेगाव व मूर्टी येथील  प्रत्येकी एक असे पाच रुग्णांचे अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आलेले आहेत तसेच आज दिवसभरात बारामती मध्ये खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 20 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील चार व ग्रामीण भागातील तीन असे सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे आज दिवसभरात एकूण 3 rt-pcr + 5 शासकीय एंटीजेन+7 खाजगी एंटीजेन एकूण पंधरा रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे बारामती रुग्णसंख्या 556 झाली आहे तसेच बारामतीतील भोई गल्ली येथील एका सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा पुणे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे त्यामुळे मृत्यूंची संख्या 27 झालेली आहे तसेच आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 310 झालेली असून सध्या उपचाराखालील रुग्ण 229 आहेत.



Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article