संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरून खासदार सुनेत्रा पवार यांचा फोटो गायब
Thursday, June 26, 2025
Edit
निरा - बारामती वार्ता - जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उंडवडी गवळ्याची येथील बुधवारचा मुक्काम आटोपून भक्तिमय वातावरणात बारामतीत प्रवेश करत आहे आज सायंकाळी बारामतीतील शारदा प्रांगण येथे मुक्कामी येत आहे.
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामतीत अनेक ठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.
परंतु राष्ट्रवादीच्या बॅनरबाजी मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. बारामतीतील बारामती नगरपरिषदेच्या काही अंतरावरच, भिगवण चौक येथे राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेला बॅनर मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुक्याच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या पत्नी, खासदार सौ.सुनेत्रा पवार यांचा स्वागतपर लावण्यात आलेल्या बॅनरवरून फोटोच गायब केल्याचे दिसत आहे. खासदार सुनेत्रा पवार यांचा फोटोचा विसर बारामती राष्ट्रवादी काँग्रेसला पडल्याचे दिसत आहे. याची सर्वत्र मोठी चर्चा आहे.