-->
मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज मार्फत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मोठ्या थाटात संपन्न

मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज मार्फत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मोठ्या थाटात संपन्न

आज 26 जून 2026 रोजी मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज यांची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मोठ्या थाटात संपन्न........ मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रशालेचे आदरणीय प्राचार्य श्री वसंतराव शेडगे सर उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने सर यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखीचे स्वागत करून सोहळ्याला शुभारंभ केला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ( दिंडी) महात्मा फुले चौक, ते गजानन चौक श्री राम मंदिर या ठिकाणी दर्शन घेतले तेथून उमाजी नाईक चौक ते मुधोजी हायस्कूल या ठिकाणी पालखीची सांगतो झाली. दिंडीमध्ये माध्यमिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी हे सर्व वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते . तसेच माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षिका उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षिका यांनी सुद्धा दिंडीमध्ये अभंग, माऊलीचा गजर, पाऊली, फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला सगळे विद्यार्थी हे सुद्धा पांडुरंगाच्या भजनात तल्लीन झाले होते. अशाप्रकारे या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची शिकवण व चांगले संस्कार जोपासले जातात.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article