-->
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आज गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे आदरणीय प्राचार्य श्री. शेडगे सर आणि उपप्राचार्य श्री. माने सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. लोणकर मॅडम यांनी अत्यंत सुबोध व प्रेरणादायी शब्दांत केले.
शिंदे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा, शिक्षणासाठी दिलेल्या भरीव योगदानाचा व समतेसाठी लढलेल्या संघर्षाचा उजाळा दिला.
यानंतर प्राचार्य श्री. शेडगे सर यांनी मार्गदर्शन करताना शाहू महाराजांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांची सांगड घालण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. लोणकर मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रम यशस्वीतेकडे नेण्यासाठी सहभागी सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले. या जयंती उत्सवाने सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article