
बारामतीच्या ग्रामीण भागात मतदारांच्या मतदानासाठी केंद्राबाहेर रांगा
Friday, January 15, 2021
Edit
मोरगांव : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज सकाळपासूनच मतदारांच्या मतदानासाठी केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या . मदतान जास्तीत जास्त होण्यासाठी गावकी , भावकी एकत्र करण्याची सर्वच पॅनलने आज कंबर बांधली होती. बारामती ग्रामीण भागात सरासरी ८५% मतदान झाले असुन तरडोली येथे सायंकाळी ६ पर्यंत मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या .
आज तरडोली येथील मतदान सरासरी 88% झाले . वार्ड क्र १ येथे ७६९ पैकी ६७३ मतदान झाले असून त्याचेर टक्केवारी ८७ आहे . वार्ड क्र २ येथे ७०२ पैकी ६१९ मतदान झाले असुन त्याची टक्केवारी ८८ . १७ आहे तर वार्ड क्र ३ मध्ये ८५८ पैकी ७७० मतदान झाले असून ८९ . ७४ टक्केवारी आहे .
आंबी खुर्द येथे वार्ड क्र १ मध्ये ९० . ३५ टक्के , वार्ड क्र २ ९४ . ३७ वार्ड क्र ३ मध्ये ८५ . ७७ टक्के झाले .
जोगवडी येथे वार्ड क्र १ मध्ये ८२ . ७७ , वार्ड क्र २ मध्ये ८७ . ०७ , वार्ड क्र ३ मध्ये ८१ .१७ टक्के मतदान झाले . मुर्टी येथे वार्ड क्र १ येथे ८१. २० , वार्ड क्र २ मध्ये ७७ . ७६ , वार्ड क्र ३ मध्ये ८८ . ८६ , वार्ड क्र ४ मध्ये ८१ . ५० टक्के मतदान झाले . उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये जमा झाले . बारामती तालुक्यातील तरडोली येथे सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या . वरील सर्वच भागात कुठलाही अनुचीत प्रकार न घडता शांतातेत मतदान झाले .
तरडोली ता . बारामती येथे मतदानासाठी मतदारांनी लावलेली रांग