
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्याचा उद्या बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून होणार जाहीर निषेध
Friday, April 8, 2022
Edit
मोरगाव : देशाचे नेते, पद्मविभूषण,आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे घरावर भ्याड हल्ला झाला केला आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व हल्ल्या मागील सुत्रधारांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी उद्या दि ९ रोजी बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शनिवार बारामती शहर पोलीस स्टेशन, जुनी कचेरी येथे जास्तीत जास्त मोठया संख्येने कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेससचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या घरावर आज भ्याड हल्ला झाला. या हल्ल्याचा तिव्र निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधीकारी व कार्यकत्यांकडून होत आहे. या भ्याड हल्ल्या पित्यर्थ व हल्ल्या मागील सुत्रधारांना ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी बारामती शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिले जाणार आहे. यासाठी तालुक्यातील पदाधीकारी व जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उद्या शनिवार दि . ९ रोजी सकाळी १० : ३० वाजता हजर राहण्याचे आवाहन बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर व इम्तियाज शिकीलकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.