डी जे टाळून लोकोपयोगी उपक्रमांनी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी: कोऱ्हाळे बुद्रुक येथील नवजीवन मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम
Friday, August 1, 2025
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक वार्ताहर - महापुरुषांच्या जयंतीला होणार डीजेचा दणदणाट टाळून कोऱ्हाळे बुद्रुक येथील नवजीवन मित्र मंडळाने समाजोपयोगी कार्यक्रम करत अनोख्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली आहे.
मंडळाच्या वतीने कोऱ्हाळे बुद्रुक येथील अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिद्धेश्वर हायस्कूल याठिकाणी शालेय साहित्यांचे वाटप केले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप धापटे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक वारुळे,माजी सरपंच रवींद्र खोमणे, ग्रामपंचायत सदस्य मोहन भगत, लालासो माळशिकारे, पोलीस पाटील शरद खोमणे, सचिन खोमणे, राहुल खोमणे, प्रसाद भगत उपस्थित होते.
त्यांनतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पोलीस ठाण्याला फ्लड लाईट भेट देण्यात आली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यावेळी उपस्थित होते.
डीजेचा खर्च टाळून शैक्षणिक व लोकोपयोगी कामे करून जयंती साजरी केल्याबद्दल नवजीवन मित्र मंडळाचे अध्यक्ष ओम अडागळे, उपाध्यक्ष अमर अडागळे व मंडळातील कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.