वडगाव निंबाळकर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न
Monday, August 4, 2025
Edit
महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्या "महाराजस्व अभियान" अंतर्गत, उपविभागीय अधिकारी कार्यालय बारामती व तहसील कार्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने "श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर" वडगाव निंबाळकर महसूल मंडळामध्ये आज उत्साहात संपन्न झाले.
या शिबिरास बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. किशोर माने साहेब, बारामती तहसीलचे निवासी तहसीलदार मा. नामदेव काळे, वडगाव निंबाळकर मंडल अधिकारी मा. गजानन पारवे, मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील, महा-ई-सेवा केंद्र चालक, व संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गावकरी व नागरिकांचाही मोठा सहभाग या शिबिरात होता.
या शिबिरादरम्यान एकूण ९१५ नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. महसूल विभागामार्फत खालील सेवा प्रदान करण्यात आल्या.
३७५ नागरिकांना विविध प्रकारचे दाखले उत्पन्न, जात, नॉन क्रिमिलिय, आधार अपग्रेडेशन व केवायसी, संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे शेतकरी ओळखपत्र वाटप, रेशन कार्ड केवायसी, तसेच आरोग्य विभागामार्फत रक्त तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या, पंचायत समितीमार्फत घरकुल मंजुरी पत्र वितरण, तसेच शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे मंजुरी पत्र यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास संभाजी होळकर, संगीता देवी निंबाळकर, सरपंच सुनील ढोले, सुनील माने, निलेश मदणे, तसेच इतर सर्व गावचे सरपंच व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली.
या शिबिरामुळे नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यास मदत झाली असून, शासनाच्या सेवा गावागावात पोहोचवण्याचा महत्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पार पडला.