के. बी. कंपनीची बदनामी करणाऱ्या तसेच खंडणी मागणाऱ्या सनी काकडे विरुद्ध फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
Friday, August 15, 2025
Edit
फलटण - के. बी. कंपनीची व्हाट्स ग्रुपवरती बदनामी करून तुमच्या कंपनीतील सर्व मॅनेजमेंट टीम विरूध्द सुध्दा खोटे गुन्हा दाखल करील व तुमची के.बी. कंपनी फलटण तालुक्यात चालु देणार नाही अशी धमकी देणारा विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन मधून दिलेली माहिती अशी, संदिप मोहन शिंदे, नोकरी के. बी. कंपनी खुटे रोड सस्तेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार के. बी. कंपनी खुटे रोड सस्तेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे ते कामावरती गेलो होते व दिवसभर कंपनीतच होते. सायंकाळी 7.00 वा चे सुमारास त्याच्या मोबाईलमध्ये 9822334400 या व्हाट्सअप नंबरवरती असलेल्या Press Friends ग्रुपवरती त्यांच्या ओळखीचे सनी घनशाम काकडे रा. मंगळवारपेठ, फलटण, ता. फलटण जि.सातारा यांनी त्यांचा व्हाट्स नंबर 9657751111 वरून सायंकाळी 6.43वा मेसेज टाकला की, "KB कडून अनेक शेतकरी बांधवांची फसवणुक केल्याचे ही समोर येत आहे कंपनी टाकल्या पासुन गोर गरीब शेतकरी बांधवांचा तरकारी माल कंपनी घेते व अनुभवी ग्रेडरने कंपनींत आणलेला माल पॅक हाउसला आल्यानंतर रिजेक्ट दाखविणे स्वतःचा फायदा करणे आणी कष्टकरी गरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा बुडावणे हे असले काळे धंदे यादवच्या कारकिर्धीत चालु आहे गरीब भोळा भाबडा शेतकरी व्याजाने पैसा आणुन पीक काढतो पण हे धोम कावळे मात्र त्या शेतकरी राज्याला फसवतात कुठे फेडणार हे सगळे आजुन नवीन मुद्दे थोड्याच वेळात... "असा मेसेज टाकला. त्यावेळी ते लगेगच फलटण येथे आले त्यावेळी रात्रौ 8.30 वा चे सुमारास सनी काकडे हा त्यांना महात्मा फुले चौकात खाऊ गल्लीच्या समोर असलेले बाकावरती बसलेला दिसला त्यावेळी ते व हेमंत बाळासाहेब खलाटे असे त्याच्या जवळ जावुन त्याला म्हणाले की, तुम्ही कंपनीची कशासाठी बदनामी करताय, आमची कंपनी 5000 शेतकऱ्यांशी निगडीत असुन त्यांची कामे करते, तसेच कंपनीत 1000 कामगार काम करतात, राजकारण विरहीत कंपनी आहे, जात-पात बगितली जात नाही कंपनीत, एवढी चांगली कंपनी चालविणारे सचिन यादव हे के. बी. कंपनीचे डायरेक्टर आहेत, त्यांची बदनामी तुम्ही फलटण मधील वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर सोशल मिडीयाव्दारे कंपनीची बदनामी का करताय? त्यावेळी सनी काकडे हा म्हणाल
ला की, आमच्या संघटनेकडे कंपनी लक्ष देत नाही, त्यावेळी त्यांना लक्ष म्हणजे नक्की काय? असे संदीप शिंदे यांनी विचारला विचारले असता ते मला म्हणाले की, "तुम्ही कंपनीशी बोला व मला दहा लाख रूपये द्या नाहीतर मी तुमच्या कंपनिची सर्व समाजात अशाच पध्दतीने बदनामी करेल तसेच तुम्हाला जर वाटत असेल की, मी काही करू नाही तर तुम्हाला मी काय करू शकतो हे माहित नाही मी तुमच्या कंपनीची बदनामी करून थांबनार नाही तर तुमाः मॅनेजमेंट टीम विरूध्द सुध्दा खोटे गुन्हा दाखल करील व तुमची कंपनी फलटण तालुक्यात चालु देणार नाही अशा प्रकारची धमकी दिली. त्यावेळी संदीप शिंदे यांनी सनी काकडे यांना आम्हाला थोडा वेळ द्या असे सांगितले असता सदरील व्यक्तीने संदीप शिंदे यांना आत्ताच्या आत्ता 35,000/- रूपये द्या म्हणजे मी आजचे सर्व मेसेज थांबवितो असे सांगितले त्यामुळे संदीप शिंदे यांनी जवळच्या ए.टी.एम. मध्ये जावुन HDFC बँकेचे ए.टी.एम कार्ड वरून रक्कम रूपये 33,000/-एवढी रक्कम काढुन सनी काकडे यांना दिली व 2000/ रूपये एवढी रक्कम उद्या ते एक नंबर देतील त्या नंबरवर सदर रक्कम ट्रान्सफर करणेस सांगितली तसेच उर्वरीत रक्कम मला दोन दिवसात नाही मिळाली तर मी वरील प्रमाणे तुमची के. बी. कंपनी फलटण तालुक्यात चालु देणार नाही व तुमच्या कंपनीच्या सर्व मॅनेजमेंट टीमवर खोटे गुन्हे
दाखल करील तसेच माझ्या विरूध्द पोलीस ठाणेत तक्रार दिली तर तुला ठार मारीन अंशी धमकी दिल्याने सनी काकडे यांचे विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 308(2),351(2), 351(3) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा करीत आहेत