रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी रविकिरण खारतोडे तर सचिवपदी महावीर शहा वडूजकर
Thursday, August 14, 2025
Edit
रोटरी वर्ष 225-2026 साठी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी रो. रविकिरण खारतोडे यांची तर सचिवपदी रो. महावीर शहा वडूजकर यांची निवड करण्यात आली. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रो.संतोष मराठे, सहाय्यक प्रांतपाल रो. नरेंद्र गांधी, रो. वसंतराव माळुंजकर,रो.राजेश राऊत रो.किरण इंगळे,रो.सविता भोर माजी पोलीस अधिकारी IPS सुरेश खोपडे, बारामती कॅटल फीडचे जनरल मॅनेजर श्री. अजय पिसाळ , स्काय ऍग्रोचे श्री. दीपक बिबे व ऍड. भगवान खारतोडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ संपन्न झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष रविकिरण खारतोडे यांना मावळते अध्यक्ष रो. अरविंद गरगटे यांनी रोटरी कॉलर, चार्टर आणि बेल तर मावळते सचिव रविकिरण खारतोडे यांनी नवनिर्वाचित सचिव महावीर शहा वडूजकर यांना कॉलर प्रदान केली.
यावेळी बोलताना प्रांतपाल रो. संतोष मराठे यांनी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या पन्नास वर्षातील कामाचा गौरव केला त्याचबरोबर बारामती क्लब स्थापन करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे प्रेस्टिनने पुढाकार घेऊन पालकत्व केलेल्याची आठवण सांगितली. आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की रोटरी जगभरात समाजासाठी काम करीत आहे. पर्यावरण संवर्धन,शिक्षण, आरोग्य,महिला सबलीकरण आदी क्षेत्रात रोटरीचे काम अत्यंत चांगले आहे.
आपल्या भाषणात मावळते अध्यक्ष रो. अरविंद गरगटे यांनी रोटरी वर्ष 2024-25 मध्ये रोटरी क्लब ऑफ बारामतीने केलेल्या कामांचा आढावा घेतला तर नवनिर्वाचित अध्यक्ष रविकिरण खारतोडे यांनी रोटरी वर्ष 2025-26 मध्ये करण्यात येणाऱ्या कामांची रूपरेषा स्पष्ट केली.
यावेळी बारामती रोटरी क्लबला देणगी दिल्याबद्दल बारामती कॅटल फीड आणि स्काय ऍग्रो यांच्या प्रतिनिधिंचा विशेष सन्मान रो. संतोष मराठे यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर रोटरी इंडिया साठी देणगी देणाऱ्या रोटरी सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. करण्यात आला त्यांचबरोबर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या विविध समित्यावर काम करणाऱ्या क्लबच्या सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.
रोटरी वर्ष 2025-25 साठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणी सदस्यांना यावेळी रोटरी पिन प्रदान करण्यात आली.यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी विकसित करण्यात आलेल्या अँपची माहिती रो. वसंतराव माळुंजकर यांनी उपस्थितांना दिली. यावेळी या अँपचे वितरण बारामती तालुका मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष संदीप जगताप आणि सचिव सिकंदर शेख यांना करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय रो. नरेंद्र गांधी यांनी करून दिला तर उपस्थितांचे आभार महावीर शहा वडूजकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.प्रा. डॉ. अजय दरेकर यांनी केले. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य, त्यांच्या परिवारातील सदस्य, रोटरीबद्दल आपुलकी असणारे देणगीदार, शिक्षक आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
रोटरी वर्ष 2025-25 साठीची कार्यकारिणी
अध्यक्ष - रो. रविकिरण खारतोडे
सचिव - रो. महावीर शहा वडूजकर उपाध्यक्ष - रो. महेश साळुंखे अध्यक्ष (2026-27)- रो. अतुल गांधी अध्यक्ष (2024-25)- रो. अरविंद गरगटे खजिनदार - रो. पार्शवेंद्र फरसोले आय.टी. ऑफिसर - रो. शिवदास गुजरे क्लब ट्रेनर - रो. प्रफुल्ल गादिया क्लब ऍडमिन - रो. अभिजित बर्गे फाउंडेशन - रो. अब्बास नाशिकवाला मेंबरशिप -रो. प्रा. डॉ. हणमंतराव पाटील
न्यू जनरेशन - रो. चेतन दोशी
पब्लिक इमेज - रो. प्रा. डॉ. अजय दरेकर सर्व्हिस प्रोजेक्ट (मेडिकल)- रो. डॉ. श्रीमंत खाडे
सर्व्हिस प्रोजेक्ट ( नॉन मेडिकल)- सी. ए. प्रतिक दोशी
इंटरनॅशनल सर्व्हिस - रो. कौशल शहा सराफ
एन्व्हॉर्नमेंट - रो. हर्षवर्धन पाटील स्पोर्ट्स -रो. दत्तात्रय बोराडे, सीएसआर - रो. सदाशिव पाटील लिट्रसी आणि शिक्षण ऍड. अक्षय महाडिक वोकेशनल - रो. प्रा. डॉ. प्रविण ताटे देशमुख