-->
मु.सा. काकडे महाविद्यालयास शालेय कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद

मु.सा. काकडे महाविद्यालयास शालेय कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद

सोमेश्वरनगर : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, येथील प्रांगनाथ संपन्न झाल्या. 
        या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे देशमुख, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर संस्थेचे सचिव सतीश लकडे सर, नितीन कुलकर्णी बारामती तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले साहेब, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे सर,संजय होळकर , भारत खोमणे या प्रसंगी उपस्थित होते.
    
     या स्पर्धेत १९वर्ष (मुले) वयोगटात आपल्या महाविद्यालयाने उपविजेतेपद प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे 
१) वायकर श्रेयस बालाजी (११वी वाणिज्य) 
२) खोमणे आयुष युवराज (१२ वी विज्ञान)
३) सोलंकर ओम राजेंद्र(१२ वी विज्ञान)
४)गायकवाड सोहम धीरज
५) गोंडे साहिल दादासाहेब (१२वी विज्ञान)
६) प्रज्वल रविराज सोनवणे (११ वी विज्ञान)
७) लगड रोहित नारायण (१२वी विज्ञान)
८) कोकरे प्रदीप संतोष(१२वी विज्ञान)
९) पवार करण संजय (११वी कला)
१०) बामणे मयूर बबन ( ११वी कला) 
११) बरकडे नवनाथ संपत (११वी कला)
१२) अभय रवी जयस्वाल (११वी कला) 
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे देशमुख यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी आदित्य लकडे विकास बनसोडे, रोहित जाधव, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनचे सहकार्य लाभले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. दत्तराज जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे आभार वरिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article