पळशीत जुगार खेळणाऱ्या ७ जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी केली कारवाई: रोख रक्कम ६३ हजार रुपये, दुचाकी जप्त करून ७ जणांवर गुन्हा दाखल
Sunday, September 14, 2025
Edit
वडगांव निंबाळकर : पळशी - पिंगळेवस्ती (ता. बारामती) येथे वडगाव निंबाळकर पोलिसांनी भाऊसाहेब करे यांचे बंद असलेल्या पडक्या घराच्या आडोशाला मोकळ्या जागेत शुक्रवारी (ता. १२) दुपारच्या सुमारास १३ पानी नावाचा जुगार पैसे लावून जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. यामधील रोख रक्कम, दुचाकी जप्त करून ६३ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत करून गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिस शिपाई विकास बळवंत येटाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. मारुती अण्णा इजगुडे (वय ५२), नारायण विठ्ठल करे (वय ५२), संतोष जयसिंग गुलदगड (वय ४०), रघुनाथ जगन्नाथ सोनवलकर (वय ६५), अंकुश विठोबा केसकर (वय ५०), गजानन रामा कडाळे, लक्ष्मण माने (सर्व रा. पळशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोणतेही अवैध व्यवसाय वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खपवून घेतले जाणार नाहीत. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर भरारी पथकाद्वारे कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी अवैध व्यवसायांची गोपनीय माहिती थेट कळवावी त्यांची नावे गोपनीय ठेवून कारवाई निश्चित केली जाईल, असे वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी सांगितले.