मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे आविष्कार संशोधन स्पर्धा संपन्न
Saturday, September 20, 2025
Edit
मु.सा.काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे महाविद्यालयीन स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 36 संशोधन प्रकल्प सादर केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे महाविद्यालयातील तरुण संशोधकांना त्यांचे प्रकल्प आणि कल्पना सादर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले. या स्पर्धेचे उद्घाटन शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी सोमेश्वरनगर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मनोगतात भारतीय अर्थव्यवस्थेतला बळकटी देण्यासाठी तरुणांकडून संशोधन होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धा समितीचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात आजच्या बदलत्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले तसेच आविष्कार संशोधन स्पर्धेचा उद्देश व विद्यार्थ्यांच्या जीवनातील आविष्कार स्पर्धेचे महत्व स्पष्ट केले. या स्पर्धेसाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून डॉ. प्रमोद जाधव यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. श्रीकांत घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ.जया कदम, डॉ प्रवीण ताटे- देशमुख, आयक्यूएसी समन्वयक डॉ. संजू जाधव तसेच डॉ. अजय दरेकर, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ.निलेश आढाव, डॉ. आदिनाथ लोंढे, डॉ. राहुल खरात, डॉ.नारायण राजुरवार, डॉ. दत्तात्रय डुबल, प्रा. रविकिरण मोरे,प्रा. पोपट जाधव, प्रा. नामदेव जाधव उपस्थित होते. प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी आभार मानले.