-->
थोपटेवाडीत ऊस शेतकरी मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात

थोपटेवाडीत ऊस शेतकरी मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात

थोपटेवाडी (ता. बारामती), दि. २१ :
रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी थोपटेवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी योगेश जगन्नाथ थोपटे यांच्या ऊसशेतावर “हुमणी किड नियंत्रण, AI तंत्रज्ञान व ऊस पीक व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तमदादा जगताप प्रमुख उपस्थित होते. मार्गदर्शन करताना ते म्हणाले –
“यापुढील काळात ऊस उत्पादन वाढवण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. पैशाची बचत करण्यासाठी काटेकोर नियोजन गरजेचे असून, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनवीन प्रयोग केले, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल.”

यावेळी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी निंबाळकर यांनी हुमणी किड नियंत्रणाविषयी सविस्तर माहिती दिली, तर माती परीक्षण विभाग प्रमुख के. के. पाटील यांनी AI टेक्नॉलॉजी व आधुनिक शेती पद्धती यावर मार्गदर्शन केले.

“ऊस शेतीला भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व मार्गदर्शन मिळाल्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे,” असे शेतकरी व योगेश थोपटे यांनी सांगत कारखान्याचे आभार मानले.
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक रणजीत मोरे, जितेंद्र निगडे, माजी संचालक शेखर खंडागळे, माजी सभापती प्रदीप धापटे,विक्रमी १३८ टन ऊस उत्पादन घेणारे संजय जगताप, के. बी. कोकरे, सुनील गायकवाड ,अजित गायकवाड, सूर्यकांत थोपटे, नानासाहेब माळशिकारे , नारायण नलावडे, राजेश वाघ, अमर थोपटे , सचिन थोपटे,यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच थोपटेवाडी व कोर्‍हाळे बुद्रुक पंचक्रोशीतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article