विनापरवाना बेकायदेशीर देशी विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोन इसमावरती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
Tuesday, September 23, 2025
Edit
वडगाव निंबाळकर - दिनांक 22/09/2025 रोजी रात्री 10/00 वाजता च्या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निरा बारामती रोड वरती मौजे निंबुत गावचे हद्दीत संशयत पिकअप न. MH 11 DD 6926 या गाडीला हात करून थांबवून पाहणी केली असता गाडीमध्ये विनापरवाना बेकायदेशी देशी विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले.
गाडीतील इसम नामे 1.शुभम रामचंद्र होळकर राहणार रावडी खुर्द तालुका फलटण जिल्हा सातारा व 2. सोमनाथ बाळासो पवार राहणार करंजेपुल तालुका बारामती जिल्हा पुणे याना गाडीतील मुद्देमालाबाबत वाहतूक पास परवाना, मुद्देमाला चे कागदपत्र व सदरचा मुद्देमाल कोठून आणला व कोठे नेत आहे याबाबत विचारणा केली असता,उडवा उडवीचे उत्तर दिल्याने सदरचा मुद्देमाल व गाडी जप्त करून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई मध्ये मुद्देमाल व पिकअप गाडी सह एकूण 11,11,375/रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील नमूद आरोपी यांची अटकेची कार्यवाही करून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई माननीय संदीपसिंह गिल्ल , पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, माननीय सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे,पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड, आबा जाधव, सूरज धोत्रे,विलास ओमासे व गृहरक्षक दलाचे सदस्य यांनी मिळून केली.