विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे वर्चस्व; मु. सा. काकडे महाविद्यालयात विभागीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न
Tuesday, September 30, 2025
Edit
सोमेश्वरनगर :- सोमेश्वरनगर येथील मु. सा .काकडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विभागीय कुस्ती स्पर्धा मुले व मुली नुकत्याच पार पडल्या सदर स्पर्धे मध्ये पुणे शहर आहिल्यानगर नाशिक व पुणे जिल्हा अशा चार विभागातून फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन व महिला अशा तिन्ही प्रकारच्या कुस्ती स्पर्धा २७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडल्या या स्पर्धेत एकूण १५६ मुले व ६४ मुली यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेच्या तिनही प्रकारामध्ये पुणे जिल्हयाने सांघिक विजेतेपद मिळवून संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व मिळविले.
कुस्ती स्पर्धा ह्या मुलांच्या फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन व मुलीच्या फ्रीस्टाईल अशा तीन प्रकारामध्ये पार पडल्या मुलांच्या फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन आणि मुलीच्या फ्रीस्टाईल या तीनही प्रकारामध्ये पुणे जिल्हा संघाने सांघिक विजेतेपद मिळविले तर आहिल्यानगर विभागाने तीनही प्रकारच्या कुस्ती स्पर्धेचे सांघिक उपविजेतेपद मिळविले .
स्पर्धेचे उद्घाटन हे संस्थेचे अध्यक्ष सतीशराव काकडे देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शारीरिक शिक्षण व क्रीडा मंडळाचे संचालक शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ .सुदाम शेळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे, पुणे जिल्हा क्रीडाविभागाचे खजिनदार डॉ . सुहास भैरट, आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच प्रा .दिनेश गुंड, प्रा .रोहिदास आमले उपस्थित होते उदघाटन मनोगतामध्ये सतीशराव काकडे देशमुख यांनी मार्गदर्शन करताना महाविद्यालयामध्ये राज्य ,राष्टीय दर्जाच्या क्रीडास्पर्धा आयोजित करून सोमेश्वर नगर परिसरामध्ये क्रीडा संस्कृती जोपासावी खेळाडू विद्यार्थ्यांनी खेळ भावनेने खेळावे असे सांगून खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी खेळाडूंनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे त्यामुळे तुमचा सराव अधिक सुखकर होईल तुम्हाला आहाराचे ज्ञान मिळेल तुमच्या खेळाला आवश्यक अशा महत्त्वपूर्ण बाबींचे ज्ञान अवगत होईल ज्याचा तुम्हाला यशाकडे जाण्यास उपयोग होईल अंतर विद्यापीठ स्तरावर पदके मिळवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा व आशियाई ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू या स्पर्धेतून निर्माण होतील असे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व पराभूत खेळाडूंनी खचून न जाता पुन्हा कष्ट करून विजयी व्हावे असे सांगितले.
डॉ. सुदाम शेळके यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कुस्तीची उज्वल परंपरा आहे त्याप्रमाणे खेळून विद्यापीठासाठी जास्तीत जास्त पदके मिळवावीत असे सांगितले महाविद्यालय विकास समितीचे आध्यक्ष मा. अभिजीत भैय्या काकडे देशमुख यांनी या स्पर्धा संयोजनाची जबाबदारी विद्यापीठाने महाविद्यालयावर सोपवल्याबद्दल आभार मानताना खेळाडूना स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या सचिव सतीश लकडे यांनी खेळाडूना आशीर्वाद दिले.
आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच दिनेश गुंड , रोहिदास आमले, मारुती सातव, डॉ. संतोष भुजबळ व त्यांचे सहकारी यांनी या स्पर्धा कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता यशस्वीपणे पार पाडल्या अशी माहिती संयोजन सचिव प्रा. बाळासाहेब मरगजे यांनी दिली चारही विभागाच्या संघाना दिलेली उपविजेतेपदाची ट्रॉफी देऊन प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी गौरविले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे , उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख , उपप्राचार्या डॉ. जया कदम , उपप्राचार्य डॉ. रजनीकांत गायकवाड आय क्यू एसी समन्वयक डॉ. संजू जाधव प्रा. राहुल गोलांदे तसेच महाविद्यालयाचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. दत्तात्रय डुबल डॉ. कल्याणी जगताप, प्रा. रणजीत कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले प्रा. दत्तराज जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.