काकडे महाविद्यालयात विभागीय "आविष्कार" स्पर्धा
Saturday, October 4, 2025
Edit
सोमेश्वरनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय "आविष्कार" स्पर्धेचे रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या "आविष्कार"संशोधन समितीचे अध्यक्ष डॉ. देविदास वायदंडे यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात रविवारी संपन्न होणारी ही "आविष्कार" स्पर्धा विद्यापीठाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार होणार असून आज पर्यंत या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा ग्रामीण विभागातील 27 महाविद्यालयातील 305 प्रल्कपांची नोंदणी झाली आहे त्याचबरोबर ज्यांना नोंदणी करता आलेली नाही असे, 75-100 प्रकल्प सहभागी होण्याची अपेक्षा डॉ. वायदंडे यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे परीक्षण करण्यासाठी विद्यापीठाने विषय तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली असून सदर परीक्षण समिती स्पर्धेतील प्रल्कपांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी सवांद साधणार आहे.
या "आविष्कार" स्पर्धेचा उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा. रवींद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आणि विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी समितीचे संचालक डॉ. विनायक जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजित काकडे देशमुख आणि प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी दिली. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सदर स्पर्धेला भेट देऊन प्रकल्प पाहावेत असे आवाहनही त्यांनी केले.
महाविद्यालयात येणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांनी आणि सोबत असणाऱ्या प्राध्यापकांनी अधिक माहितीसाठी "आविष्कार" स्पर्धेचे स्थानिक समन्वयक प्रा. डॉ. श्रीकांत घाडगे यांचेशी ( संपर्क क्रमांक 9604010702) संपर्क करावा असे आवाहन प्राचार्य डॉ. वायदंडे यांनी केले आहे.