अवैधरित्या वेश्या व्यवसाय करिता जबरदस्तीने चारचाकी वाहनातून नेणाऱ्या दोन महिलाची सुटका; दोन सराईत आरोपी अटक, वडगाव निंबाळकर पोलीसांची मोठी कारवाई
Tuesday, September 16, 2025
Edit
दिनांक 15/09/2025 रोजी करंजे पूल बस स्टॉप परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, एक संशयित लाल रंगाची काळया काचा असलेली गाडी फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या अनुषंगाने नाकाबंदी लावून गाडी थांबवून पाहणी केले असता, त्यामध्ये संशयित दोन पुरुष व दोन महिला मिळून आल्या. त्यांची महिला पोलीस कॉन्स्टेबल यांच्या समक्ष कसून चौकशी केली असता, सदर दोन पीडित महिला यांना पैशाचे आमिष दाखवून बेकायदेशीर, अवैधरीत्या वेश्या व्यवसाय करता जबरदस्तीने हडपसर पुणे येथून लोणंद येथे आणून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून आज पुन्हा त्यांना या गैर कृत्या करिता नीरा बारामती रोड ने इसम नामें 1. सुयोग हिंदुराव खताळ राहणार कापडगाव लोणंद तालुका फलटण जिल्हा सातारा व गाडी चालक 2. प्रीतम आप्पासाहेब घुले राहणार कापडगाव लोणंद तालुका फलटण जिल्हा सातारा हे दोघे त्यांचा ताब्यातील स्विफ्ट गाडी न.MH 11 MD 8055 घेऊन जात असल्याबाबतचे समोर आले.
यातील पीडित महिलेची फिर्याद घेऊन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 140(3),143(3),144(2),3(5) व महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 4,5 प्रमाणे वरील नमूद दोन आरोपी वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास करून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास नाळे व पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई माननीय संदीपसिंह गिल्ल , पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, माननीय सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विलास नाळे पोलिस निरीक्षक,नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, डी एस वारुळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार अमोल भोसले व एस पी देशमाने , रमेश नागटिळक, कुंडलिक कडवळे, पोपट नाळे निलेश जाधव, नागनाथ परगे यांनी मिळून केली.