बारामतीच्या विकासाला चालना मिळणार; लवकरच बारामतीचा तालुक्याचा PMRDA मध्ये समावेश
Wednesday, September 17, 2025
Edit
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती तालुक्याचा आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये अर्थात (पीएमआरडीए) समावेश होणार आहे. त्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्याबाबत प्रस्ताव देण्याबाबत राज्य शासनाने पत्र दिले होते. त्यानुसार 'पीएमआरडीए ने 2 सप्टेंबर रोजी प्रस्ताव पाठविला आहे.
बारामती शहर आणि तालुक्यातही नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे त्या भागातील रस्ते व इतर सुनियोजित विकासासाठी स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता आहे. त्यासाठी बारामती तालुक्याचा पीएमआरडीए' मध्ये समावेश करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला फडणवीस यांनीही तत्वतः मंजुरी दिल्याचे सांगितले जाते.
या भागातील रस्ते, तसेच सुनियोजित नागरीकरणासह विविध विकासकामे पीएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहेत. बारामती शहर आणि तालुक्यातही नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे त्या भागातील रस्ते व इतर नियोजित विकासासाठी स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता आहे. त्यासाठी पीएमआरडीएच्या हद्दीत समावेशाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
बारामती तालुका
लोकसंख्या : ३५५८३९
नगर परिषद :१
नगरपंचायत :
महसुली गावे : ११३
ग्रामपंचायती : ९९
पीएमआरडीएचे सध्याचे कार्यक्षेत्र
पीएमआरडीएचे क्षेत्रफळ: ६,९१४ चौरस किलोमीटर
लोकसंख्या : ७३.२१ लाख (अंदाजे)
महापालिका : २
छावणी मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) : ३
नगरपालिका परिषद ः ७
नगरपंचायत : २
अंतर्गत गावे : ६९७
शासनाकडे अहवाल सादर
बारामती तालुका पीएमआरडीएमध्ये समावेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाकडून सूचना करण्यात आल्यानंतर अहवाल देण्यात आला.