महिलांनी शासनाच्या वतीने उपलब्ध योजनांचा लाभ घेऊन प्रगती करावी - प्रमोद जाधव
Wednesday, September 17, 2025
Edit
माळेगाव बुद्रुक.. शासनाच्या वतीने उपलब्ध असणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त घेऊन महिलांनी आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे उद्गगार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव यांनी काढले. माळेगाव येथील शंकर संकुल सभागृहात महिला आर्थिक विकास महामंडळांनी आयोजित कार्यक्रमात जाधव बोलत होते, ते पुढे म्हणाले नव तेजस्विनी महाराष्ट्र रुल वुमेन्स एंटरप्राईजेस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चा सविस्तर अभ्यास करून या प्रोजेक्टच्या अनुसंधाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला बचत गटांना
उद्योग धंद्याकरिता नवीन आर्थिक भाग भांडवलाचा पुरवठा केला जातो ,त्याचा लाभ बचत गटातील महिलांनी घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची उन्नती करावी असे आवाहन प्रमोद जाधव यांनी करून असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती सोप्या पद्धतीने महिलांसमोर विशद केली .कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका संघर्ष लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक धनश्री काळे यांनी केले होते .यावेळी पुणे जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण ,सहाय्यक समन्वय अधिकारी सतीश भारती ,लेखापाल शंतनु कांबळे, उपजीविका सल्लागार निखिलेश काकडे, रयत बँक बारामती शाखाप्रमुख उल्का पवार, जिव्हाळा गाव विकास समितीच्या अध्यक्षा नलिनी भोईटे ,ऑल इंडिया जनसेवा संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा स्वाती येळे,संगीता चावरे ,कल्पना जगताप ,यांसह बचत गटाच्या सहयोगिनी ,प्रेरक,व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.