
लाटे, मुढाळे सह बारामती तालुक्यातील १३ गावांत हाय कोरोनाचा हाय अलर्ट जारी तर कोऱ्हाळे, पणदरे, वडगांव सह १५ गावांत अलर्ट
बारामती : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. आधी शहरांमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने आता गावखेड्यात धडक दिलीय. त्यामुळे तालुका आणि गाव पातळीवरील प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य 11 गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 15 गावांमध्ये अलर्ट जारी केला गेलाय. बारामतीमध्ये मागील महिन्याभरात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळतोय. दररोज सरासरी 300 नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्णसंख्येवर आधारीत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यात मागील दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय.
बारामती नगर परिषदेतील हाय अलर्ट आणि अलर्टवर असणारी गावे -
हाय अलर्ट - बारामती नगर परिषद, माळेगाव नगर पंचायत, गुणवडी, मुढाळे, झारगडवाडी, होळ, कटफळ, सोनगाव, लाटे, मुरुम, काऱ्हाटी, सावळ, शिर्सूफळ.
अलर्ट - काटेवाडी, निरावागज, पणदरे, वंजारवाडी, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बुद्रुक, डोरलेवाडी, पिंपळी, मळद, मेखळी, सांगवी, गोजुवाडी, खांडज, मोरगाव, कन्हेरी.
दुसरीकडे पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी या महत्वाच्या शहरांसह 9 गावे हाय अलर्ट आणि दहा गावे अलर्ट श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
हाय अलर्ट - जेजूरी नगर परिषद, सासवड नगर परिषद, पिसर्वे, बेलसर, माळशिरस, वाल्हे, पिंपरे, पिंपरे खुर्द, राख, धालेवाडी, नाझरे क. प.
अलर्ट - दिवे, निरा, कोळविहीरे, वाघापूर, बीर, झेंडेवाडी, बाळदरी, पारगाव, परींचे, गुळूंचे.