
तिळगुळ समारंभात पत्रकार संघाद्वारे डॉ मनोज खोमणे आरोग्यरत्न, ए. पी. आय. सोमनाथ लांडे समाजरक्षक व बाळासाहेब शेंडकर समाजसैनिक पुरस्काराने सन्मानित
Sunday, January 17, 2021
Edit
खुन ,दरोडे व लुटी चे मोठमोठे गुन्हे अवघ्या काही तासात उघडकीस आणुन स्वत: वर हल्ला झाला तरी न डगमगता आरोपीना पकडणारे वडगाव निंबाळकर चे स .पोलीस निरिक्षक सोमनाथ लांडे याना "समाजरक्षक पुरस्कार"
आयुष्यभर सैन्याच्या माध्यमातून देशसेवा करणाऱ्या व उत्तरार्धात देखील पुरग्रस्त मदत, रक्तदान शिबीर, कोरोना काळात २५० कुटुंबीयाना व परप्रांतीयाना अन्नधान्य वितरण, सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या घरची कोणतीही अडचण सोडविणार्या बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ, सोमेश्वरनगर च्या समाजोपयोगी कार्याबद्दल अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर याना " समाजसैनिक ' पुरस्काराने गौरविण्यात आले. मानचिन्ह, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचेसह उपाध्यक्ष शैलेश रासकर, शेतकरी कृती समिती अध्यक्ष सतीश भैय्या काकडे, माजी अध्यक्ष शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रमोदकाका काकडे, राजेशजी चव्हाण ई मान्यवर यावेळी उपस्थीत होते.